पप्पाची परी - २


खुप खेळण्यांचा अट्टाहास नसतो,
आम्हा दोघांना खेळायला,
एक साधा टॉवेल ही पुरतो.


तिच्या चेहऱ्यावर टॉवेल टाकून,

मी पटकन खाली खेचतो,


कावरीबावरी ती इकडे तिकडे बघायला लागते,
मी दिसलो तिला की मग खुदकन हसायला लागते...


मग बोळक्यामधे   आलेले दात दिसतात,
  दिवसभरातले सगळे ताण विसरायला लावतात..



Comments

Popular posts from this blog

हुंदका

खरंच का लेक तेव्हा परकी होते ?

अन तु हसलीस