शेअर बाजार आणी लोकल ट्रेन१. भीती :- सगळ्यात आधी "भीती" दोन्ही गोष्टींची वाटते.
शेअर बाजार  मध्ये पैसे टाकले आणी शेअर बाजार  कोसळले तर माझे पैसे बुडतील
आणी लोकल ट्रेन मधून एवढ्या गर्दीत ट्रेन मधून पडून जीव गमावण्याची भीती.

२. वेग :- जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या पैसे बचत योजने अंतर्गत पैसे बचत करत असाल तर तुम्हाला वार्षिक ७ ते ८ टक्के याच्यावर व्याजदर मिळत नाही. अगदी यामध्ये कोणत्याही  बँकेचा अपवाद नाही.
पण तेच पैसे योग्य मार्गदर्शन घेऊन शेअर बाजारात गुंतवले तर तुमची ठेव वर्षात कितीही वाढवता येते. अगदी वर्षभरात दुप्पट देखील करता येऊ शकते, म्हणजे पैसा वाढीचा वेग वाढतो

तसच लोकल नी प्रवास केल्यावर रोड वरच्या ट्रॅफिक आणी फिरून जाणारे रस्ते या मुळे जास्त वेळ जातो तो जास्तीचा वेळ वाचतो आणी आपण वेगात हवं त्या ठिकाणी पोहचू शकतो.

३.  वेळ वाचतो - पैसा वाढीचा आणी प्रवासाचा वेग वाढल्या मुळे दोन्ही ठिकाणी आपला अनमोल वेळ वाचतो...

४. शिस्त - वरवर दोन्ही गोष्टी आपल्याला बेशिस्त वाटतात. पण थोडस आत डोकावून पाहिलं तर जाणवेल की दोन्ही ठिकाणी खूप बेशिस्त पणा असतो.. पण नीट पाहिलं तर हा बेशिस्त पणा फक्त नवखे लोक करत असतात... जे मुरलेले आणि रोजचे असतात त्यांच्या मध्ये कमालीची शिस्त असते..


दोन्ही ठिकाणी दोन वेळा असतात जेव्हा तिथे खूप घाई गडबड असते... ट्रेन मध्ये सकाळी ऑफिस ला जाताना आणी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर..
तर शेअर बाजारात जेव्हा शेअर बाजार उसळी मारतो तेव्हा आणी जेव्हा शेअर बाजार कोसळतो तेव्हा,

बाकीच्या वेळी दोन्ही ठिकाणी शांतपणे सर्व व्यवहार चालू असतात

एक महत्त्वाचा नियम दोन्ही बाबतीत लागू होतो - ट्रेन मधून जेव्हा गर्दी उतरत असते तेव्हा कधीच चढायची घाई करायची नाही... आणी शेअर बाजार कोसळत असताना कधी शेअर घेण्याची घाई करू नये..

 गर्दी ला उतरायला वेळ द्यावा.. गर्दी सगळी ओसरली की मग ट्रेन मध्ये चढायचं अन तिकडे बाजार कोसळून स्थिरावला की मग शेअर खरेदी करावा


शेअर बाजाराचा प्रवास ट्रेन च्या भाषेत

१. इन्व्हेस्टर (गुंतवणूकदार) - हे खिडकीच्या बाजूला बसलेले प्रवासी.. त्यांना कसलिही घाई नसते.. त्यांना लांबचा प्रवास करायचा असतो...
शेअर बाजारातले सगळ्यात चांगले शेअर घेऊन कसलीही घाई न करता बरेच वर्ष ते शेअर स्वतः जवळ ठेवून देतात. यामधून त्यांना वार्षिक डिव्हिडिनट मिळतो शिवाय चांगले शेअर्स चांगली प्रगती करून चांगला परतावा देतात.

डिलिव्हरी - हे मधेच उभे असलेले प्रवासी जास्त लांब प्रवास करत नाहीत, चार पाच स्टेशन गेली की लगेच उतरणारे... थोडासा फायदा घेऊन लगेच शेअर विकून टाकणारे.

रोज ट्रेडिंग करणारे - हे ट्रेन च्या दरवाजात उभे असलेले प्रवासी.. यांना खूप घाई असते... जवळपास प्रत्येक स्टेशन वर हे उतरतात चढतात...

बोरिवली ते चर्चगेट ट्रेन मध्ये नेहमी प्रवास करावा लागतो तेव्हा हे गोष्ट आता रोज अनुभवतो... तिथे सकाळी गर्दीत प्रत्येक स्टेशनवर उतरणाऱ्यांची वेगवेगळ्या रांगा असतात.. कुणीही ही शिस्त मोडण्याचा प्रयत्न केला की तो चेंगरतो..

थोडक्यात हे शेअर बाजारात आणी ट्रेन मध्ये रोज जे चेंगरणारे असतात ते बहुदा सगळे नवखेच असतात


Comments

Popular posts from this blog

खरंच का लेक तेव्हा परकी होते ?

पप्पाची परी - २