Posts

शेअर बाजार आणी लोकल ट्रेन

Image
१. भीती :- सगळ्यात आधी "भीती" दोन्ही गोष्टींची वाटते. शेअर बाजार  मध्ये पैसे टाकले आणी शेअर बाजार  कोसळले तर माझे पैसे बुडतील आणी लोकल ट्रेन मधून एवढ्या गर्दीत ट्रेन मधून पडून जीव गमावण्याची भीती. २. वेग :- जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या पैसे बचत योजने अंतर्गत पैसे बचत करत असाल तर तुम्हाला वार्षिक ७ ते ८ टक्के याच्यावर व्याजदर मिळत नाही. अगदी यामध्ये कोणत्याही  बँकेचा अपवाद नाही. पण तेच पैसे योग्य मार्गदर्शन घेऊन शेअर बाजारात गुंतवले तर तुमची ठेव वर्षात कितीही वाढवता येते. अगदी वर्षभरात दुप्पट देखील करता येऊ शकते, म्हणजे पैसा वाढीचा वेग वाढतो तसच लोकल नी प्रवास केल्यावर रोड वरच्या ट्रॅफिक आणी फिरून जाणारे रस्ते या मुळे जास्त वेळ जातो तो जास्तीचा वेळ वाचतो आणी आपण वेगात हवं त्या ठिकाणी पोहचू शकतो. ३.  वेळ वाचतो - पैसा वाढीचा आणी प्रवासाचा वेग वाढल्या मुळे दोन्ही ठिकाणी आपला अनमोल वेळ वाचतो... ४. शिस्त - वरवर दोन्ही गोष्टी आपल्याला बेशिस्त वाटतात. पण थोडस आत डोकावून पाहिलं तर जाणवेल की दोन्ही ठिकाणी खूप बेशिस्त पणा असतो.. पण नीट पाहिलं तर हा बेशिस्त पणा फक

पप्पाची परी - २

Image
खुप खेळण्यांचा अट्टाहास नसतो , आम्हा दोघांना खेळायला , एक साधा टॉवेल ही पुरतो . तिच्या   चेहऱ्यावर   टॉवेल   टाकून , मी   पटकन   खाली   खेचतो , कावरीबावरी   ती   इकडे   तिकडे   बघायला   लागते , मी   दिसलो   तिला   की   मग   खुदकन   हसायला   लागते ... मग बोळक्यामधे न   आलेले दात दिसतात ,   दिवसभरातले सगळे ताण विसरायला लावतात ..

पप्पाची परी - १

Image
खेळत होती पिलू , पप्पा आला दारात , आवाज दिला पिलूला एकदम  गोड सुरात ... पप्पाचा आवाज ऐकताच पिलू   बावरली , खेळ थांबवून , मान वळवून , कावरीबावरी नजर तिची आवाजाची दिशा शोधू लागली गोड गोड हसली जेव्हा तीला पप्पा दिसला , मग नाचत , ओरडत तिने आनंदाने ठेका धरला बाथरूम कडे जात जात पप्पा म्हणाला पिलूला फ्रेश होवून येतो मग आपण खेळू खेळ ... हट्ट करून जोरात रडु लागली , डोळ्यानी बोलली ..   दिवसभर वाट पाहीली . आता नका घालवू वेळ धीर धरवेना बापाला आता , त्याने   मागे वळून पिलूला कडेवर घेतली ... रडणारी पिलू एकदम हसू लागली , दिवसभरातला क्षीण सगळा गळून गेला.. जेव्हा पिलू त्याच्या मागे धावू लागली..

हुंदका

सगळे आप्त तिच्या भोवती एकवटले , गळ्यात पडून , डोळ्यात पाणी आणून तिची रजा घेवू लागले . तो मात्र लांब उभा , तिच्या जवळ जाण्याची हिम्मत एकवटू लागला लहानपणीचे   तिचे बोबडे बोल आठवू लागला ... शेवटी सगळ्यांना बाजूला सारुन तीच जवळ आली , बाबा !!! हाक मारुन धाय मोकलून रडू लागली ... तो मात्र वरुन शांत , पण आतल तुफान बाहेर येण्या पासुन रोखु लागला .. लेकीला डोळ्या समोर धरुन डोळ्यात साठवू लागला ... आता लेक पाठमोरी , दूर निघून चालली .... अन् मनात दाबलेली भावना बाहेर येण्याची वाट शोधू लागली ... अन् कल्लोळाला भेदून गेला , तो बाहेर आल्यावर , अचानक थांबला हबकून वाजंत्री , मिठीमध्ये मुलीच्या बाप रडल्यावर ....!!

मरहम

ना जाने कितने साल चले वो मुकदमे, जब किसीं फुल सी बच्ची की इज्जत लुट गयी I इतना शोर क्यू करते हो जनांब, क्या तुम्हांरी दुकान टूट गयी ?. वो भी किसीं बच्ची का बाप होगा, इतना बडा कदम उठाणे से पहले, उसने कुछ तो सोचा होगा I जब आधे जले शरीर को देख, खून उसका भी तो खौला  होगा. दुकान तो उसकी भी थी , पर व्यापार छोड, उसने हमारे जजबातो को देख लिया, बरसो से खून बहते जखम पर, उसने कुछ मरहम सा रख दिया

खरंच का लेक तेव्हा परकी होते ?

भरल्या मांडवत गळ्यात पडून रडल्यावर जेव्हा ती पाठमोरी होते, खरंच का लेक तेव्हाच परकी होते ? खूप दिवसांनी जेव्हा चार दिवसासाठी माहेरी येते... कसे सरतात ते दिवस कळत ही नाही, अन आपली चिमणी भूरकण उडून ही जाते... खरंच का लेक तेव्हा परकी होते ? ती बोलताना आशेने तो तिच्याकडे पाहत राहतो, पण तिच्या बोलण्यात असतात फक्त सासरच्या गप्पा... बोलता बोलता तीचं त्याच्याकडे लक्ष जात, मग भानावर येऊन विचारते, "तुम्ही ठीक आहात ना पप्पा" ? खरंच का लेक तेव्हा परकी होते ? जेवण झाल्यावर हात पदराला पुसते, लग्ना आधी रिमोट वरुन भांडायची, आता मात्र टीव्ही वर जे लावलय ते बघत बसते.. काल परवा अल्डल अवखळ असणारी ती, आता चार समजूतीच्या गोष्टी करते... खरंच का लेक तेव्हा परकी होते ? आठ वाजता उठणारी‌ ती आता पाच वाजताच‌ उठते, झोप येत नाही म्हणून मग आईला घरात किचन मध्ये मदत करत बसते.. खरंच का लेक तेव्हा परकी होते ? सासरी जाता जाता सगळ्यांच्या डोळ्यात पाणी देऊन जाते, सगळ्यांना परकं अन घराला पोरक करून जाते खरंच का लेक तेव्हा परकी होते ?

अन तु हसलीस

Image
मळभ आलेल आभाळ, अन पहाटे ने जकडलेली सकाळ... निपचीत पडलेला मोर... अन पावसाची वाट पाहनारा चकोर... बागेतली कोमेजलेली फुले.. घरात झोपलेली मुले.... किरकिर करणारे रातकीडे, अन झडुन पडलेले मोगऱ्याचे सडे रात्री ने सुर्याला काळोखात झाकलेले... अन थकून भागून सगळे पक्षी झोपलेले अन तु हसलीस ☺️😊 आभाळाने मळभ सोडली... अन सुंदर सकाळ उजेडली... मोर नाचू लागला... अन चकोर पावसात चिंब झाला... बागेतली फुल उमलली... अंगणात मुल खेळु लागली... रातकीडा शांत झोपी गेला.. अन मोगरा सुगंध पसरवु लागला.. सुर्याची किरणे जमीनीवर डोकाऊ लागली.. अन पक्षाची किलबिल ऐकू येवू लागली... कारण तू हसू लागलीस 😘😘