हुंदका
सगळे आप्त तिच्या भोवती एकवटले,
गळ्यात पडून, डोळ्यात पाणी आणून तिची रजा घेवू लागले.
तो मात्र लांब उभा, तिच्या जवळ जाण्याची हिम्मत एकवटू लागला
लहानपणीचे तिचे बोबडे बोल आठवू लागला...
शेवटी सगळ्यांना बाजूला सारुन तीच जवळ आली,
बाबा !!! हाक मारुन धाय मोकलून रडू लागली...
तो मात्र वरुन शांत, पण आतल तुफान बाहेर येण्या पासुन रोखु लागला..
लेकीला डोळ्या समोर धरुन डोळ्यात साठवू लागला...
आता लेक पाठमोरी, दूर निघून चालली....
अन् मनात दाबलेली भावना बाहेर येण्याची वाट शोधू लागली...
अन् कल्लोळाला भेदून गेला,
तो बाहेर आल्यावर,
अचानक थांबला हबकून वाजंत्री,
मिठीमध्ये मुलीच्या बाप रडल्यावर....!!
Pg 👌👌👌
ReplyDelete