खरंच का लेक तेव्हा परकी होते ?

भरल्या मांडवत गळ्यात पडून रडल्यावर जेव्हा ती पाठमोरी होते,
खरंच का लेक तेव्हाच परकी होते ?

खूप दिवसांनी जेव्हा चार दिवसासाठी माहेरी येते...
कसे सरतात ते दिवस कळत ही नाही,
अन आपली चिमणी भूरकण उडून ही जाते...

खरंच का लेक तेव्हा परकी होते ?

ती बोलताना आशेने तो तिच्याकडे पाहत राहतो,
पण तिच्या बोलण्यात असतात फक्त सासरच्या गप्पा...
बोलता बोलता तीचं त्याच्याकडे लक्ष जात,
मग भानावर येऊन विचारते,
"तुम्ही ठीक आहात ना पप्पा" ?

खरंच का लेक तेव्हा परकी होते ?

जेवण झाल्यावर हात पदराला पुसते,
लग्ना आधी रिमोट वरुन भांडायची,
आता मात्र टीव्ही वर जे लावलय ते बघत बसते..

काल परवा अल्डल अवखळ असणारी ती,
आता चार समजूतीच्या गोष्टी करते...

खरंच का लेक तेव्हा परकी होते ?

आठ वाजता उठणारी‌ ती आता पाच वाजताच‌ उठते,
झोप येत नाही म्हणून मग आईला घरात किचन मध्ये मदत करत बसते..

खरंच का लेक तेव्हा परकी होते ?

सासरी जाता जाता सगळ्यांच्या डोळ्यात पाणी देऊन जाते,
सगळ्यांना परकं अन घराला पोरक करून जाते

खरंच का लेक तेव्हा परकी होते ?

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हुंदका

अन तु हसलीस