पप्पाची परी - १
खेळत होती पिलू, पप्पा आला दारात,
आवाज दिला पिलूला एकदम गोड सुरात...
पप्पाचा आवाज ऐकताच पिलू बावरली,
खेळ थांबवून, मान वळवून,
कावरीबावरी नजर तिची आवाजाची दिशा शोधू लागली
गोड गोड हसली जेव्हा तीला पप्पा दिसला,
मग नाचत, ओरडत तिने आनंदाने ठेका धरला
बाथरूम कडे जात जात पप्पा म्हणाला पिलूला
फ्रेश होवून येतो मग आपण खेळू खेळ...
हट्ट करून जोरात रडु लागली, डोळ्यानी बोलली..
दिवसभर वाट पाहीली. आता नका घालवू वेळ
धीर धरवेना बापाला आता,
त्याने मागे वळून पिलूला कडेवर घेतली...
त्याने मागे वळून पिलूला कडेवर घेतली...
रडणारी पिलू एकदम हसू लागली,
दिवसभरातला क्षीण सगळा गळून गेला..
जेव्हा पिलू त्याच्या मागे धावू लागली..
Mast
ReplyDelete