अन तु हसलीस

मळभ आलेल आभाळ,
अन पहाटे ने जकडलेली सकाळ...

निपचीत पडलेला मोर...
अन पावसाची वाट पाहनारा चकोर...

बागेतली कोमेजलेली फुले..
घरात झोपलेली मुले....

किरकिर करणारे रातकीडे,
अन झडुन पडलेले मोगऱ्याचे सडे

रात्री ने सुर्याला काळोखात झाकलेले...
अन थकून भागून सगळे पक्षी झोपलेले

अन तु हसलीस ☺️😊

आभाळाने मळभ सोडली...
अन सुंदर सकाळ उजेडली...

मोर नाचू लागला...
अन चकोर पावसात चिंब झाला...

बागेतली फुल उमलली...
अंगणात मुल खेळु लागली...

रातकीडा शांत झोपी गेला..
अन मोगरा सुगंध पसरवु लागला..

सुर्याची किरणे जमीनीवर डोकाऊ लागली..
अन पक्षाची किलबिल ऐकू येवू लागली...

कारण तू हसू लागलीस 😘😘
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

Comments

Popular posts from this blog

हुंदका

खरंच का लेक तेव्हा परकी होते ?