स्वप्नातल घर
छोटासा तलाव, बाजूला छानशी बाग... त्या मधे असेल आपल छोटस घर...
अन् तुझ्या सोबत जगण्याच्या धुंदीत माझ्या स्वप्नाना लागलेले पर....
पकड हात माझा अन माझ्या स्वप्नाच्या दुनियेत चल...
अन माझ्या स्वप्नातल जग आपल्या स्वप्नातल कर...
बागे मधे आपल्या फुलं असतील जाई, जुई, मोगरा....
स्वप्नातल्या त्या जगा मधे करु प्रत्येक दिवस साजरा...
आंबा, पेरू, सिताफळ.. आपल्या बागेची शोभा वाढवतील....
तापलेल्या त्या उन्हात आपल्या घराला मायेची ऊब देतील.....
फळ तर ते पिंपळाच झाड देनार नाही...
पण त्याच्या गर्द छायेत... तो सुर्य आपल्याला छळणार नाही....
संध्याकाळ ची वेळ.. मंद प्रकाश, तलावाच्या बाजूला तुझ्या डोळ्यात मी हरवून जाईन...
अन् मावळतीला लागलेला सुर्य तुझ्या डोळ्यात पाहीन...☺️
Chhan q
ReplyDelete