दोन मजली राजवाडा

भरून आलेल मन,‌
 डोळ्यात आलेल पाणी,

दोन मजली घर आपल,
बघ कस दिसतय राजवड्यावाणी.

स्वप्न हे पुर्ण करायला,‌
आपण किती म्हनुन झिजलो,

परत परत जळत राहिलो,
जेव्हा जेव्हा विझलो.

आता स्पारटेक्स अन् टाईल्सच्या प्रकाशात
उजळेल आपल घर,
आनंदाने तोल जाईल माझा,
तू आधारासाठी हात माझा धर.

माडीवरून आपल्या पाहू त्या पाऊसाच्या सरी बरसतील
काळे काळे ढग, अन् वीजा गरजतील..

मनात कितीतरी भावनांच काहूर माजलेल,
मग समाधानाचे अश्रु पावसाच्या थेंबात मिसळतील

Comments

Popular posts from this blog

हुंदका

खरंच का लेक तेव्हा परकी होते ?

अन तु हसलीस