शेअर बाजार आणी लोकल ट्रेन
१. भीती :- सगळ्यात आधी "भीती" दोन्ही गोष्टींची वाटते. शेअर बाजार मध्ये पैसे टाकले आणी शेअर बाजार कोसळले तर माझे पैसे बुडतील आणी लोकल ट्रेन मधून एवढ्या गर्दीत ट्रेन मधून पडून जीव गमावण्याची भीती. २. वेग :- जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या पैसे बचत योजने अंतर्गत पैसे बचत करत असाल तर तुम्हाला वार्षिक ७ ते ८ टक्के याच्यावर व्याजदर मिळत नाही. अगदी यामध्ये कोणत्याही बँकेचा अपवाद नाही. पण तेच पैसे योग्य मार्गदर्शन घेऊन शेअर बाजारात गुंतवले तर तुमची ठेव वर्षात कितीही वाढवता येते. अगदी वर्षभरात दुप्पट देखील करता येऊ शकते, म्हणजे पैसा वाढीचा वेग वाढतो तसच लोकल नी प्रवास केल्यावर रोड वरच्या ट्रॅफिक आणी फिरून जाणारे रस्ते या मुळे जास्त वेळ जातो तो जास्तीचा वेळ वाचतो आणी आपण वेगात हवं त्या ठिकाणी पोहचू शकतो. ३. वेळ वाचतो - पैसा वाढीचा आणी प्रवासाचा वेग वाढल्या मुळे दोन्ही ठिकाणी आपला अनमोल वेळ वाचतो... ४. शिस्त - वरवर दोन्ही गोष्टी आपल्याला बेशिस्त वाटतात. पण थोडस आत डोकावून पाहिलं तर जाणवेल की दोन्ही ठिकाणी खूप बेशिस्त पणा असतो.. पण नीट पाहिलं तर हा बेशिस...